एकरकमी एफआरपी देण्याची राजू शेट्टी यांची मागणी

पुणे : साखर उद्योगाने साखरेपासून इथेनॉल उत्पादनाच्या दिशेने पाऊल उचलले आहे. यांदरम्यान शेतकरी नेता आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या हिताबाबत समझोता केला जाणार नाही असे सांगत पारदर्शी प्रक्रियेची मागणी केली आहे. राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन शेतकऱ्यांशी संबंधीत मुद्यांबाबत चर्चा केली. यांदरम्यान, शेट्टी यांनी साखर कारखान्यांकडून एकरकमी एफआरपी दिली जावी अशी मागणी केली.

कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखाने वगळता इतर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीचे पैसे हफ्त्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. ऊसाचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून एक फॉर्म भरून घेतला. त्यामध्ये हफ्त्यांमध्ये एफआरपीस मंजुरी देण्यात आली होती.

शेट्टी यांनी आयआयटीसारख्या नामवंत संस्थांकडून इथेनॉल बनविणाऱ्या साखर कारखान्यांचे तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी केली. इथेनॉल, साखर कारखान्यांद्वारे ऊस अथवा मोलॅसिसपासून बनविण्यात येत आहे. केंद्र सरकारने इथेनॉलची ग्रेडनिहाय किंमत निश्चित केली आहे. ऊसाच्या रसापासून उत्पादित इथेनॉलचा दर अधिक आहे. साखर कारखान्यांसाठी इथेनॉल उत्पादन हे साखर उत्पादनापेक्षा अधिक फायदेशीर आहे. कारण, उत्पादनाला सातत्याने दर मिळत आहे. साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉलचे उत्पादन करण्याचा पर्याय निवडण्यासाठी कारखान्यांना फायद्याचा ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here