बंद साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी रालोदची निदर्शने

संतकबीर नगर : राष्ट्रीय लोक दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करावे, बंद खलीलाबाद साखर कारखाना पुन्हा सुरू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे नऊ मागण्यांचे निवेदन प्रशासन अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

राष्ट्रीय लोक दलाचे किसान विभागाचे प्रदेशाध्यक्ष गंगा सिंह सैंथवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी पाहता बंद असलेल्या खलीलाबाद साखर कारखाना आणि मगहर येथील कताई साखर कारखाना सुरू करण्याची गरज आहे असे कार्यकर्त्यांनी सांगितले. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी बस स्थानकाची स्थापना करावी. सेमरियावा बाजाराला शहर म्हणून घोषित करावे, शेतकऱ्यांकडील भात खरेदीसाठी खरेदी केंद्र सुरळीत ठेवावे आणि खलीलाबाद ते मुखलिसपूर चौकासमोर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग तयार करावा. या मागण्या लवकर पुर्ण केल्या नाहीत तर संघटना जनहितार्थ आंदोलन करेल असा इशारा प्रदेशाध्यक्षांनी दिला.

यावेळी प्रदेश सचिव रामानंद गौड, प्रल्हाद चौधरी, बाल सिंह, पीयूष कुमार सिंह ऊर्फ लोहा सिंह, अजय सिंह सैंथवार, तीजू प्रसाद, अवध निरंजन, रामसागर चौधरी, दुर्गेश सिंह, नबी हसन, रफीक अहमद, महेश यादव, राजवंत चौधरी, धर्मेंद्र कुमार मिश्र, रामनवल शर्मा, विपिन सिंह, रमाकांत चौधरी, ब्रजेंद्र यादव, राजकुमार गौड, गंगेश्वर यादव, मान सिंह, फैसल, जमाल अहमद यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here