ऊस थकबाकी भागवण्यासाठी शेतकर्‍यांनि घेतली जिल्हा ऊस अधिकार्‍याची भेट

150

रामपूर: भारतीय किसान यूनियन च्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हा ऊस अधिकार्‍यांची भेट घेतली. ऊस थकबाकी न भागवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या स्थितीची गंभीरता पाहून जिल्हा ऊस अधिकार्‍यांनी साखर काऱखान्याच्या व्यवस्थापकांशी फोनवरुन संवाद साधला आणि ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवण्याबाबत त्यांच्यावर दबाव टाकला. यावर करीमगंज साखर कारखान्याने 4.77 करोड रुपये भागवले. इतर कारख़ान्यांकडून लवकरच थकबाकी भागवण्याचे आश्‍वासन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष हसीब अहमद यांनी सांगितले की, शाहबाद आणि बिलासपूर येथील शेतकरी गुरुवारी सकाळी कार्यालयात आले. त्यांनी सांगितले की, साखर कारखाने शेतकर्‍यांना त्यांचे ऊसाचे पैसे देत नाहीत . करीमगंज च्या राणा साखर कारखान्याकडून 67.45 करोड रुपये, त्रिवेणी कारखान्याकडून 45.54 करोड रुपये आणि रुद्र बिलास साखर कारखान्याकडून 27 करोड रुपये देय आहेत. यावेळी मंजीतसिंह अटवाल, जागीर सिंह, सलविंदर सिंह चीमा, राहत वली खां, सुभाष चंद्र शर्मा, वीरेंद्र सिंह यादव, यासीन खां, होम सिंह यादव, विनोद यादव आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here