ऊस थकबाकीवरुन शेतकर्‍यांची निदर्शने, सामाजिक अंतर राखून केले आंदोलन

रामपूर(उत्तरप्रदेश) : भारतीय किसान यूनियन अन्नदाता च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पसिसरामध्ये सामाजिक अंतर राखत ऊस थकबाकीच्या मुद्यांसह इतर समस्यां विरोधात निदर्शने केली. यानंतर पंतप्रधानांना देण्यात येणारे निवेदन जिल्हाधिकार्‍यांकडे सुपुर्द केंले. ज्यामध्ये शेतकर्‍यांच्या समस्यांचे लवकरच निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे युवा नेंता प्रदेश अध्यक्ष उस्मान अली पाशा म्हणाले, सरकार शेतकर्‍यांना कायमच कर्जदार बनवू पाहते. जिल्ह्यामध्ये मध्ये तीन साखर कारखान्यांवर शेतकर्‍यांचे करोडो रुपये देय आहेत. याबाबत कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. तर सरकार उद्योगपतींना अनेक प्रकारच्या सवलती देत आहे. ते म्हणाले, कॉन्वेन्ट स्कूल आणि विज विभागासह सहकार विभागही शेतकर्‍यांवर वसुलीसाठी दबाव टाकत आहे. तर खाजगी शाळांमद्ये फीवरुन दबाव टाकला जात आहे. या सार्‍यावर आता अंकुश घातला गेला नाही तर संघटना शांत बसणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हा प्रभारी मुहम्मद फैजान, जिल्हा सचिव मुहम्मद शाकिर खान, मुहम्मद इमरान, हफीज अहमद खान आणि राहूल राजपूत आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here