राणा शुगर मिलतर्फे १५ शेतकऱ्यांना हफ्त्यांवर ट्रॅक्टर

रामपूर, उत्तर प्रदेश: करीमगंजच्या राणा शुगर मिलतर्फे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ऊसाचे उत्पादन वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यावेळी पंधरा शेतकऱ्यांना साखर कारखान्यातर्फे मिनी ट्रॅक्टर उपलब्ध करुन देण्यात आले. शेतकऱ्यांना एक लाख रुपये सूट देण्यासह आठ सुलभ हप्त्यांमध्ये ट्रॅक्टरचे पैसे द्यावे लागतील.

शनिवारी पूर्वाह कारखाना परिसरात मेळाव्याचे आयोजन केले होते. उप जिल्हाधिकारी राकेश गुप्ता, मुरादाबादचे ऊस उपायुक्त अमर सिंह, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अजय कुमार सिंह, रामपूरचे हेमराज सिंह, डॉ. पी. के. कपिल, शहाजहांपूरच्या ऊस शेतकरी संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. सुदीप प्रताप सिंह, राणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधीर सिंह, ऊस विभागाचे सरव्यवस्थापक के. पी. सिंह, गुरवचन सिंह उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना उसाच्या उत्पादन वाढीबाबत माहिती दिली यांत्रिकीकरण आणि तंत्रामुळे उत्पादन वाढू शकते असे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या सर्व्हेमध्ये ऑनलाईन घोषणापत्र भरणे अनिवार्य असल्याचे उपायुक्तांनी सांगितले. जर घोषणापत्र भरले नाही तर करार समाप्त होईल अशा इशारा त्यांनी दिला. पंधरा शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची सूट देऊन आठ हफ्ते भरण्याच्या शपथपत्रासह मिनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिल्याचे सर व्यवस्थापकांनी सांगितले. ऊंचागांव, केसरपूर येथे प्रत्येकी दोन, नबीगंज, धुरियाई, बिलारीमधील छपरा, अटवा, जहांगीरपूर, पटवाई, छितौनी, रुपपूर, रसूलपूर येथील एका शेतकऱ्याचा समावेश आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here