ओडिसातील केंद्रपाडा जिल्ह्यात ऊस लागवडीत गतीने घट

केंद्रपाडा : जिल्ह्यातील ऊस पिकाच्या लागवडीत गतीने घसरण झाली आहे. बंद पडलेले साखर कारखाने आणि ऊस विक्रीसाठी असलेले मर्यादीत पर्याय हेच याचे मुख्य कारण असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

तीन दशकांपूर्वी केंद्रपाडा जिल्ह्यात ऊस हेच मुख्य पीक होते. एक दशकापूर्वी जिल्ह्यात १५००० हेक्टरवर ऊसाची लागवड केली जात होती. आता या वर्षी अवघ्या ५००० हेक्टरवर शेतकऱ्यांनी ऊस लागण केली आहे. गारदापूर, मंगागहाई, डेरबाशी, पट्टामुंडई, राजकनिका आणि महाकालपाडा या प्रमुख ठिकाणी शेतकरी ऊस शेतीला प्राधान्य देतात.
याबाबत पेटामुंडई येथील ऊस उत्पादक शेतकरी अक्षय बेहरा सांगतात, खूप वर्षापूर्वी आम्ही साखर कारखान्यांना आणि खुल्या बाजारात ऊस विक्री करून चांगले पैसे मिळवत होते. तीन दशकांपूर्वी कृष्णदासपूर गावातील साखर कारखाना बंद पडला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा झटका बसला. त्यानंतर त्यांनी ऊसाऐवजी इतर पिकांकडे लक्ष केंद्रीत केले. जर अशीच स्थिती राहिली तर ऊस पिक जिल्ह्यातूनच गायब होण्याची स्थिती येईल.

शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश चंद्र सिंह म्हणाले, गेल्या निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि इतर नेत्यांनी जिल्ह्यात साखर कारखाने सुरू करण्याची केवळ घोषणा केली. मात्र, निवडणुकीनंतर ते सर्वजण आपले आश्वासन विसरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here