रत्नागिरी : कृषि दिनानिमित्त कुटरे येथे कृषि दिंडीचे आयोजन

रत्नागिरी : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील कृषिविश्व- कृषिदूत संघातील ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, अनिकेत मस्के, संग्राम पाटील, सुमित सावंत, यश मगर, सुयश शिंदे, आदित्य शिरसाट, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश वाली, संदेश डोमाळे, ओंकार फाळके यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जे.वाय.शिर्के हायस्कुल, कुटरे येथे महाराष्ट्र कृषिदिन साजरा केला.

या कार्यक्रमानिमित्त जे.वाय.शिर्के हायस्कूल ते कुटरे बाजारपेठेपर्यंत ‘जय जवान जय किसान’, ‘शेतकऱ्यांचा विकास, देशाचा विकास’ अशा घोषणा देत कृषि दिंडी काढण्यात आली.तुषार यादव यांनी विद्यार्थ्यांना कृषि दिनाचे महत्व पटवून दिले.कृषि दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धांचे प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण तसेच वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी आणलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून उपसरपंच सुरभी जाधव लाभल्या तसेच सदस्य अमरदीप कदम, नितेश मोहिते, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here