श्री रेणुका शुगर्स लिमिटेडच्या संचालक मंडळात रवि गुप्तांचा समावेश

महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या देशातील सर्वात मोठी साखर रिफायनरी आणि इथेनॉल उत्पादक श्री रेणुका शुगर्स लिमिटेड, मुंबईने २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रवि गुप्ता यांचा समावेश केला. पाच वर्षांसाठी अतिरिक्त कार्यकारी संचालक म्हणून गुप्ता यांची नियुक्ती केली आहे.

श्री रवी गुप्ता यांना साखर, इथेनॉल, धान्य, तिळ अशा विविध वस्तूंचा गेल्या तीन दशकांचा अनुभव आहे. ते २०१३ पासून श्री रेणुका शुगर्स लिमिटेडसोबत (एसआरएसएल) काम करीत आहेत. सध्या ते कंपनीचे कॉर्पोरेट अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गुप्ता हे साखर आणि इथेनॉल उद्योगात सक्रिय आहेत. भारतातील इथेनॉल मिश्रण धोरणात त्यांचे प्रमुख योगदान आहे.

एसआरएसएलमध्ये आपल्या भूमिकेशिवाय रवी गुप्ता हे देशभरातील विविध प्रतिष्ठित संघटनांतून कार्यरत आहेत. तेथे ते आपले ज्ञान, अनुभवाच्या माध्यमातून योगदान देत आहेत. वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे (डब्ल्यूआयएसएमए) ते मानद सदस्य आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (सीआयआय) ते साखरेच्या टास्क फोर्सचे सदस्य आहेत. इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या (आयएफदीई) इथेनॉल समुहाचेही ते सदस्य आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here