आरबीआय ने एसडीएफसी बँकला नवे क्रेडिट कार्ड जारी करण्यापासून रोखले

खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने गुरुवारी सांगितले की, रिजर्व बँक ने त्यांना आपल्या आगामी डिजीटल उद्योजकीय हालचाली आणि नवे क्रेडिट कार्ड जारी करण्याला अस्थायीपणे रोखण्यास सांगितले आहे. केंद्रीय बँकेने एचडीएफसी चे डाटा सेंटरमध्ये गेल्या महिन्यात कामकाज प्रभावित झाल्यामुळे हा आदेश दिला.

एचडीएफसी ने शेअर बाजाराला सांगितले की, आरबीआय ने एचडीएफसी बँक लिमिटेड ला दोन डिसेंबर 2020 ला एक आदेश जारी केला आहे, जो गेल्या दोन वर्षांमद्ये बँकेच्याग इंटरनेंट बँकिंग/मोबाईल बँकिंग/ पेमेंट बॅकिंग मध्ये आलेल्या अडचणीशीं संबंधीत आहे. ज्यामध्ये अलीकडेच 21 नोव्हेंबर 2020 ला प्राइमरी डाटा सेंटर मध्ये विज गेल्याने बँकेचे इंटरनेट बँकिंग आणि पैसे भागवण्याची प्रणाली बंद झाल्याचा समावेश आहे.

एचडीएफसी बँकेने सांगितले की, आरबीआय ने आदेशामध्ये बँकेला सल्ला दिला की, डिजिटल 2.0 आणि इतर प्रस्ताविक आईटी अंतर्गत आगामी डिजिटल व्यापार विकास हालचाली आणि नवे क्रेडिट र्का ग्राहकांच्या सेवा थांबवाव्यात. एचडीएफसी बँकेने सांगितले की, याबरोबरच बँकेचे निदेशक मंडलास सांगितले की, त्यांनी आपल्यातील कमीची तपासणी करावी.

एचडीएफसी बँकेने सांगितले की, गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांनी आपली आईटी सिस्टिम मजबूत करण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. आणि उर्वरीत काम गतीने पूर्ण करण्यात येईल. बेँकेने सांगतिले की, डिजिटल बँकिंग चैनल्समध्ये अडचणी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलत आहे आणि आशा आहे की, सध्याचे क्रेडिट कार्ड, डिजिटल बँकिंग चैनल्स आणि परिचालन यांच्यावर नियामकीय निर्णयाचा कोणताही प्रभाव पडणार नाही. बँकेनुसार, या उपायांमुळे त्यांच्या समग्र व्यवसायावर कोणताही परीणाम होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here