आरबीआय ने केला कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द

117

भारतीय रिजर्व बँकेने महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेला मोठा धक्का दिला आहे. आरबीआय नें कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, बँकेकडे पुरेसा वित्तसाठा नाही. याचा अर्थ असा की, बँकेला अनेक डिपॉजिट अनेक रीपेमेंट करण्याचा अधिकार नाही. परवाना रद्द होण्याबरोबरच आता ही बँक भविष्यात कारभार करु शकणार नाही.

सेंट्रल बँकेने महाराष्ट्राच्या सहकारी समित्यांचे रजिस्ट्रार आणि सहकारिता आयुक्त यांनाही आग्रह केला की, त्यांनी बँक बंद करावी आणि एक लिक्विडेटरची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.

आरबीआय ने सांगितले की, बँकेच्या जमाकर्त्याना त्यांचे जमा झालेले पैसे परत मिळवण्यासाठी एक सामान्य प्रक्रिया केली जाईल. ज्याअंतर्गत बँकेच्या प्रत्येक जमाकर्त्यांला निर्धारीत नियम आणि अटींअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे भागवले जातील. हे पैसे इंश्योरन्स आणि क्रेडिट गारंटी कॉर्पोरेशन करेल. या प्रक्रियेअंतर्गत बँकेच्या 99 टक्के जमाकर्त्यांना त्यांची पूर्ण रक्कम परत मिळेल.

आरबीआय ने मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका नोटीसीमध्ये सांगितले आहे की, बँकेकडे पुरेसा निधी नाही आणि कमाईची शक्यता नाही. बँक आपल्या सध्याच्या जमाकर्त्यांना पूर्ण पैसा देेवू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर बँकेला पुढे कारभार करण्यास मंजुरी दिली गेली तर बँकेचे सार्वॅजनिक हित प्रभावित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here