आरबीआयकडून आणखी एका बँकेवर निर्बंध

नवी दिल्‍ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आणखी एका सहकारी बँकेवर निर्बंध लागू केले आहेत. आरबीआयने महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बँक, यवतमाळवर अनेक निर्बंध लागू केले आहेत. बँकेच्या ग्राहकांना फक्त ५००० रुपये काढण्याची मर्यादा असेल. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने सांगितले की, बँकिंग विनियमन अधिनियमन १९४९ च्या अंतर्गत ८ नोव्हेंबर रोजी कामकाज बंद झाल्यानंतर सहा महिन्यासाठी हे निर्बंध लागू केले आहेत. त्यांचा आढावा घेतला जाईल.

यवतमाळमधील ही सहकारी बँक रिझर्व्ह बँकेच्या अनुमतीविना कोणालाही पैसे देऊ शकत नाही अथवा कर्ज, अॅडव्हान देऊ शकत नाही. याशिवाय बँकेला आरबीआयच्या मंजुरीशिवाय कोणालाही पैसे घेता येणार नाहीत. आपली मालमत्ता विकून अथवा हस्तांतरीत करुनही पैसे जमा करता येणार नाहीत. बँकेची सध्याच्या आर्थिक स्थिती पाहता बँकेतील चालू खाते अथवा इतर खात्यामधून खातेधारकांना ५००० रुपयांहून अधिक रक्कम काढता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here