कर्जदारांना दिलासा नाहीच, रेपोदर जैसे थे

मुंबई : पतधोरणातील व्याजदर स्थिर राहिल्याने गृह, वाहन आणि इतर कर्जांचे दर हे कायम राहण्याची शक्यता आहे. कारण रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या पतधोरणात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे बँकेचा रेपो दर 5.15 टक्के स्थिर आहे. सलग पाचवेळा बँकेने रेपो दरात कपात केली होती. मात्र बँकांनी व्याजदर कपातीला फारसा प्रतिसाद दिला नाही. गव्हर्नर शक्तिकांत दास हे या बैठकीत रेपो दरात किमान पाव टक्क्याची कपात करतील अशी आशा सर्वांना होती. परिणामी रिव्हर्स रेपो दर हा 4.90 टक्के इतकाच राहिला आहे.

समितीमधील सर्व सहा सदस्यांनी व्याजदर स्थिर ठेवण्यावर शिक्कामोर्तब केले, तसेच बँकेने विकासदराबाबत चिंताही व्यक्त केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान, किरकोळ आणि घाऊक बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतीयामुळे येत्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महागाईमुळे मागणी कमी झाल्याने विकासदर कमी होण्याची अडचणही वाढली आहे.

आर्थिक वर्षातील द्वैमासिक पतधोरण आज रिझर्व्ह बँकेने जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत पाच टक्क्याखाली आलेला विकास दर आणि वाढलेले महागाईचे दर पाहता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कपतीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here