पीएमसी बँकेतून दहा हजार काढण्याची मुभा

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतून (पीएमसी) खातेदारांना आता सहा महिन्यातून एकदा दहा हजार रुपये काढण्याची मुभा मिळाली आहे. रिझर्व्ह बॅकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादताना खातेदारांना बँकेतून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, गुरुवारी त्यांनी एक परिपत्रक जारी करुन दहा हजारापर्यंत रक्कम काढण्याची परवानगी दिली.

व्यवहारामध्ये अनियममिता आढळल्याने दोन दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बॅेकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले होते. या गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे व्यस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना निलंबित करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, बचत आणि चालू खात्यातून बँकेच्या खातेदारांना आता दहा हजार रुपये काढता येतील. दरम्यान, पीएमसी बँकेच्या अनेक खातेधारकांनी गुरुवारी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांनी संगनमताने भ्रष्टाचार करुन जतनेचा पैसा लुटल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

आरबीआय च्या अधिकार्‍यांची मोठी रक्कमही पीएमसी बँकेत अडकली आहे. या अधिकार्‍यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स क्रेडिट सोसायटी नावाची संस्था आहे. या संस्थेने पीएमसी बँकेत तब्बल 105 कोटींची मुदत ठेव असल्याची माहिती समोर आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here