कर्ज देणार्‍या संस्थानी व्याजावरील व्याज माफी लागू करावी: आरबीआय

146

भारतीय रिजर्व बँकेने सर्व कर्जदाता संस्थांना सांगितले की, त्यांनी दोन करोड रुपयापर्यंतच्या कर्जासाठी अलीकडेच घोषित व्याज माफी योजनेला लागू करावे. या योजनेअंतर्गत दोन करोड रुपयापर्यंत च्या कर्जावरील व्याजावर असणारे व्याज एक मार्च 2020 पासून सहा महिन्यासाठी माफ केले जाईल. सरकारने पात्र कर्ज खात्यांसाठी चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज च्या मधील फरक भागवण्याबाबत अनुदान योजनेची 23 ऑक्टोबरला घोषणा केली होती. सरकारने सर्व बँकांना पाच नोव्हेंबरपर्यंत चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याजाच्या फरकाला कर्जदारांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सांगितले होते.

रिजर्व बँकेने एका अधिसूचनेमध्ये सांगितले की, सर्व ऋणदाता संस्थांना योजनेतील प्रावधानांकडून निर्देशित करणे आणि निश्‍चित वेळेच्या आत आवश्यक ती कारवाई करण्याचा सल्ला दिला जातो.

सुप्रीम कोर्टाच्या व्याज माफी योजनेच्या अंमलबजावणीच्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने परिचालन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.शीर्ष कोर्टाने 14 ऑक्टोबर ला केंद्राला निर्देश दिले होते की, केंद्राने कोविड 19 महामारीला पाहता सामान्य लोकांच्या हितार्थ त्यांना दिलासा देण्याची योजना लागू करावी.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here