RBI ने पाच बँकांना ठोठावला ५० लाखांहून अधिकचा दंड

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने गुरुवारी १८ जानेवारी २०२४ रोजी पाच सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारून लाखोंचा दंड ठोठावला. बँकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. ज्या सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली, त्यात एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातची मेहसाणा नागरिक सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरिक सहकारी बँक लिमिटेड यांचा समावेश आहे. हा दंड बँकांच्या कामकाजाशी संबंधित कामांवर लावण्यात आला असून, त्याचा त्यांच्या सेवेवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. बँकांचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे.

रिझर्व्ह बँकेने NKGSB सहकारी बँकेला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणाची माहिती देताना आरबीआयने सांगितले की, बँकेने चालू खाते उघडताना आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही. तसेच ग्राहकांना खात्यात व्यवहार करण्याची परवानगी दिली गेली होती. तपासणीनंतर RBI ने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये बँकेने दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधानी न झाल्यामुळे RBI ने NKGSB सहकारी बँकेला ५० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय कर्ज आणि अॅडव्हान्स देताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने गुजरातमधील मेहसाणा सहकारी बँकेला ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतर नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दि पाटडी नागरिक सहकारी बँक लिमिटेड आणि मेहसाणा नागरिक सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.या पाच बँकांवर आरबीआयने लादलेल्या आर्थिक दंडाचा बँक ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here