RBI ने अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ केले बरखास्त

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने शुक्रवारी अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाला 12 महिन्यांच्या कालावधीसाठी बरखास्त केले. RBI ने 12 महिन्यांसाठी बँकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची “प्रशासक” म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासक पाठक यांना मदत करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने सल्लागारांची समितीदेखील नियुक्त केली आहे.

आरबीआयने निवेदनात म्हटले आहे कि, सल्लागार समितीचे सदस्य म्हणून व्यंकटेश हेगडे (माजी महाव्यवस्थापक, SBI), महेंद्र छाजेड (सनदी लेखापाल) आणि सुहास गोखले (माजी एमडी, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड) हे काम पाहतील. आरबीआयने म्हटले आहे कि, खराब प्रशासनामुळे अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विरुद्ध कारवाई करणे जरुरीचे होते. विशेष म्हणजे RBI ने बँकेवर कोणतेही व्यावसायिक निर्बंध घातलेले नाहीत आणि प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली बँक आपले नियमित कामकाज करू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here