RBS Renewablesच्या वतीने महाराष्ट्रात इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची योजना

मुंबई : देशभरात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक ठिकाणी नव्याने डिस्टिलरी स्थापन करण्यात येत आहे. आरबीएस रिन्युएबल्सने (RBS Renewables) महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील उदापूर गावात इथेनॉल उत्पादनासाठी २०० KLPD धान्यावर आधारित डिस्टिलरी स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.

Projects Today मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हा प्रकल्प २२.६१ एकर जमिनीवर उभारला जाईल आणि यामध्ये ५.५ मेगावॅटच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचाही समावेश आहे. नव्या अपडेटनुसार, कंपनीला या प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा आहे. ठेकेदार आणि मशीनरी पुरवठादारांना अंतीम रुप देण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम २०२३ मध्ये सरू होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प २०२४ च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here