चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पुन्हा प्रसार, लान्झोउ शहरात लॉकडाऊन

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्याचे दिसून येत आहे. संक्रमण रोखण्यासाठी सरकारने उत्तर-पश्चिम विभागातील लान्झोउ शहरात लॉकडाऊन लागू केला आहे. या शहराची लोकसंख्या ४० लाख इतकी आहे. चीनमध्ये स्थानिक स्तरावर कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर अत्यावश्यक कामांसाठीच त्यांना घराबाहेर पडता येईल.

स्थानिक स्तरावर २९ रुग्ण आढळल्यानंतर सरकारने शहरात लॉकडाऊन लागू करीत असल्याचे जाहीर केले. लान्झोऊच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकांवर कडक नजर ठेवली जात आहे. ते केवळ उपचारासाठी बाहेर पडू शकतात. चीनमधील इतर काही भागातही असे नियम लागू केले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळे ओस पडू लागले आहेत.

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरियंटचा फैलाव यामागे असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या आठवडाभरात १०० हून अधिक रुग्ण आढळले होते. हा विषाणू नेहमीपेक्षा अधिक गतीने फैलावतो. सरकारने या फैलावासाठी परदेशात जाणाऱ्या लोकांना जबाबदार ठरवले आहे.

दरम्यान मंगोलिया मधील काऊंटी एजिनमध्येही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. येथील लोकसंख्या ३५,७०० इतकी आहे. या ठिकाणी सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here