दिलासादायक, सप्टेंबरमध्ये दोनदा पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू केले आहेत. आज, सहा सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

एक दिवसापूर्वी, रविवारी जनतेला दिलासा देताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १५ – १५ पैसे कपात करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

एक आठवड्यानंतर सप्टेंबरच्या एक तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १५ पैशांचा दिलासा मिळाला होता. आज दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.१९ रुपये तर डिझेलचा दर ८८.६२ रुपये प्रती लिटर आहे.

महानगरांतील इंधन दरांवर एक दृष्टिक्षेप टाकला असता आज मुंबईत पेट्रोल १०७.२६ रुपये आणि डिझेल ९६.१९ रुपये प्रती लिटर दराने विक्री होत आहे. चेन्नईत पेट्रोल ९८.९६ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९३.२६ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०१.६२ रुपये असून डिझेल ९१.७१ रुपये प्रती लिटर दराने विक्री केली जात आहे.
बेंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यासारख्या महानगरातही पेट्रोल १०० रुपयांवर आहे. वाहतूक शुल्क आणि व्हॅट आकारणीमुळे विविध राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे असतात.

पश्चिम बंगाल, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडीसा, तामिळनाडू, केरळ, बिहारसह विविध राज्यांत पेट्रोल १०० रुपयांवर आहे.

पेट्रोल-डिझेलचा दर आपल्याला एसएमएसवरही उपलब्ध होऊ शकतो. इंडियन ऑईलने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मोबालईलवरुन RSP असा संदेश आणि आपल्या शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा. दररोज सकाळी सहा वाजता नवे दर जाहीर केले जातात. पेट्रोल, डिझेलच्या दरात एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन आणि इतर गोष्टींचा समावेश केल्यानंतर हे दर जवळपास दुप्पट होतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here