टिकोला साखर कारखान्याकडून १ एप्रिलपर्यंतच्या उसाचे पैसे जमा

154

मेरठ : टिकौला साखर कारखाना रामराजच्यावतीने २०२०-२१ या गळीत हंगामातील २९ मार्च ते एक एप्रिल या कालावधीतील उसाचे पैसे संबंधित समित्यांकडे पाठविण्यात आले आहेत. रामराज समितीच्या सचिवांनी यास दुजोरा दिला आहे.

मंगळवारी टिकोला साखर कारखाना राजराजने चालू गळीत हंगामातील एक एप्रिल अखेरच्या ऊस बिलांचे पैसे संबंधित समित्यांकडे पाठवले. कारखान्याचे अध्यक्ष एम. सी. शर्मा यांनी सांगितले की, २९ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत खरेदी केलेल्या ऊसापोटी १० कोटी ३१ लाख रुपयांची बिले सर्व समित्यांना पाठविण्यात आली आहेत.

रामराज समितीचे सचिव सुभाष चंद्र यादव यांनी बिले दिल्याच्या माहितीस दुजोरा दिला. याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर लगेच शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून पैसे पाठविले जातील असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here