नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे 1,874 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात झालेल्या पावसामुळे आणि पुरामुळे १,८७४ जणांचा मृत्यू झाला आहे तर आणखी ४६ बेपत्ता असल्याची माहिती एमएचएच्या (MHA) अधिकाऱ्यांनी दिली आहे. २२ राज्यांतील २५ लाखाहून अधिक लोकांवर पूराचा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात मृतांचा आकडा सर्वाधिक म्हणजेच ३८२ वर पोचला आहे, त्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलन अशा तिहेरी स्थितीमुळे देशातील ३५७ जिल्ह्यांमध्ये २२७ लोक मृत झाले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुरामुळे ७३८ लोक जखमी झाले आणि जवळपास २०,००० जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर १.०९ लाख घरांचे मोठ नुकसान झाल आहे आणि १४.१४ लाख हेक्टर पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाल आहे.    देशातील काही भागात मॉन्सून सक्रिय असला तरी, हा हंगाम अधिकृतपणे 30 सप्टेंबर रोजी संपला आहे. चार महिन्यांच्या कालावधीत भारतामध्ये १९९४ नंतर सर्वाधिक पाऊस पडला असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले.

महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. ३८२ लोक मरण पावले, ३६९ जखमी आणि ७.१९ लाख लोकांना ३०५ मदत शिबिरात आश्रय घ्यावा लागला. पश्चिम बंगालमध्ये २२७ जणांनी आपला जीव गमावला. सध्या पूरात सापडलेल्या बिहारमध्ये  १६१ जणांचा बळी गेला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here