युपी: मुजफ्फरनगर जिल्ह्यात इथेनॉलचे उच्चांकी उत्पादन

मुजफ्फरनगर : जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी यावर्षी इथेनॉलसाठी उच्चांकी ५२६ लाख ६२ हजार क्विंटल बी हेवी मोलॅसिस तयार केले आहे. या कारखान्यांना एक क्विंटल उसापासून साडेसहा टक्के मोलॅसिस मिळाले आहे. या मोलॅसिसपासून ३३ ते ३५ टक्के इथेनॉल तयार केले जात असून, ते बाजारात ५६ ते ६० रुपये प्रती लिटर दराने विकले जात आहे. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढल्यानंतर जिल्ह्यातील चारही साखर कारखान्यांनी बी हेवी मोलॅसिस बनविण्यास गती दिली आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, खतौली, खाई खेडी, मन्सूरपूर आणि भैसाना साखर कारखान्यांनी उच्चांकी ५२६.६१ लाख क्विंटल बी हेवी मोलॅसिसचे उत्पादन केले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना इथेनॉलच्या माध्यमातून चांगली कमाई करता येणे शक्य आहे. पुढील हंगामात सर्व आठ साखर कारखान्यांमध्ये बी हेवी मोलॅसिस तयार करण्याची तयारी आहे. जिल्हा ऊस अधिकारी ओमप्रकाश सिंह यांनी सांगितले की, मागणीनुसार कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन वाढविले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आठ साखर कारखान्यांपैकी केवळ चार कारखाने, खतौली, मन्सूरपूर, खाईखेडी आणि भैसाना यामध्येच बी हेवी मोलॅसिसचे उत्पादन होते. खतौली साखर कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, त्यांचा उतारा १.४२ टक्क्यांनी घटला आहे. यावेळी हा उतारा ९.८६ टक्क्यांवर आला. मन्सूरपूर कारखान्याचा उताराही १.३० टक्क्यंनी घटून ९.४२ टक्क्यावर आला आहे. खाईखेडी कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.४६ टक्के आणि भैसाना कारखान्याचा उतारा १०.१३ टक्के आहे. यावेळी बी हेवी मोलॅसिसमुळे उतारा १.३२ टक्के कमी झाला आहे, असे जिल्हा ऊस अधिकारी ओमप्रकाश सिंह यांचे म्हणणे आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १०.२४ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here