डॉलरच्या तुलनेत रुपयाची निच्चांकी स्तरावरून रिकव्हरी, जाणून घ्या सध्याची काय आहे किंमत

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत आज रुपया १३ पैशांनी मजबूत होवून ७८.३९ च्या तुलनेत ७८.२६ वर खुला झाला. रुपयामध्ये आज निच्चांकी स्तरावरुन रिकव्हरी होताना दिसून येत आहे. सद्यस्थितीत रुपया ९ पैशांनी वाढून ७८.२३ वर दिसून आला.

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १९ पैशांनी कमजोर होवून ७८.३९वर बंद झाला होता. यादरम्यान डॉलर इंडेक्स ००५ टक्के किरकोळ घसरून १०४.१४ वर पोहोचला आहे. याबाबत रिलायन्स सिक्युरिटीच्या श्रीराम अय्यर यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या घसरणीसह डॉलरच्या तुलनेत रुपया मजबुतीने ओपन झाला आहे. ब्रेंट क्रूड ऑईल फ्युचर २.१७ टक्के घसरून १०९.३२ डॉलर प्रती बॅरलवर आला आहे. देशांतर्गत इक्विटी बाजाराकडे पाहिल्यास शॉर्ट कव्हरींगने बाजारात जोश आल्याचे दिसते. सेन्सेक्स, निफ्टी एक टक्क्यांपेक्षा अधिक वधारले आहेत. बँक, मीडकॅप, स्मॉलकॅपमध्येही चमक दिसून आली. जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी असेन्शुअरच्या चांगल्या निकालाच्या अपेक्षेने भारतीय आयटी सेक्टरमध्ये दोश दिसून आला. आयटी इंडेक्स १ टक्क्याने वधारला आहे. टीसीएस,

इन्फोसीस, एचसीएल चेक, एटीटीएसमध्ये २ टक्के वाढ दिसून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here