मुसळधार पावसामुळे गुजरात मध्ये रेड अलर्ट, 6 पेक्षा अधिक राज्यांनाही हवामान विभागाचा इशारा

नवी दिल्ली : देशभऱामध्ये मान्सून सातत्याने आपली गती वाढवत आहे. यामुळे अनेक भागांमध्ये हवामानात सतत बदल होत आहे. देशाच्या मध्य भागातून उत्तर भागात यावेळी मान्सून सक्रिय आहे. भारतीय हवामान विभागानुसार येणार्‍या दोन दिवसात देशाच्या 6 पेक्षा अधिक राज्यांमद्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे. तर गुजरात मध्ये गेल्या काही तासांमद्ये झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. इथे अनेक जिल्हे पुराच्या धोक्याशी संघर्ष करत आहेत.

हवामान विभागा नुसार, मंगळवारी देशाच्या अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये ओडिसा, राजस्थान, बिहार आणि उत्तराखंड प्रामुख्याने सामिल आहेत. तर दिल्ली एनसीआर मध्येही अनेक भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे. मैदानापासून पहाडी भागा पर्यंत मान्सून ने यावेळी चांगलाच वेग घेतला आहे. मैदानी परिसरात मंगळवारी ओडिसा, राजस्थान आणि बिहारच्या काही परिसरात चांगल्या पवासाचे संकेत आहेत, तर पहाडी भागात उत्तराखंड मध्ये मान्सून आवश्यकेपेक्षा अधिक आहे.

हवामान विभागानुसार, देशाच्या अनेक राज्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे. पश्‍चिम बंगाल च्या काही भागात मोठा पाऊस होवू शकतो. तर हवामान विभागानुसार, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्‍चिमी राजस्थान, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, असम, मेघालय, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, आंध्र प्रदेश च्या किनारपट्टी बरोबर तमिळनाडू, पॉंडिचेरी आणि केरळ च्याही काही भागात जोरदार वार्‍यासह पावासाची शक्यता आहे.

तर पुढील क्षेत्राचा दबाव असल्याने गुजरात आणि पश्‍चिमी राजस्थान च्या काही भागात जोरदार वारा येण्याची शक्यता आहे. इथे 50-60 किमी प्रती तास वारा आणि पाऊस सुरु होईल.

मुसळधार पावसामुळे गुजरातची स्थिती वाईट आहे. इथे अनेक नद्या भरल्यामुळे नदीचे पाणी आता रस्त्यावर आले आहे. प्रदेशातील सात जिल्ह्यांची अवस्था खराब आहे. तीन दिवसांमद्ये आता पर्यंत पावसामुळे 9 लोकांना जिव गमवावा लागला आहे.

महसाणा, पाटन, सूरत, गिर सोमनाथ, साबरकांठा, अहमदाबाद, गांधीनगर, अरावली आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यातील काही भागात सर्वात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here