तिरुवनंतपुरम : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार केरळमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून राज्य सरकारने 6 जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट‘ घोषित केला आहे. याशिवाय केरळमधील मलाबार किनार्यासह आसपासच्या भागातही रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी केरळमध्ये सर्वात मोठा पाऊस झाला होता. ज्यामुळे केरळमधील संपूर्ण जनजिवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. शेकडो नागरीक या पावसात बळी गेले होते. एक महिन्यापर्यंत ही अवस्था अशीच राहिली होती.
यंदाही केरळमध्ये अतिशय जोरदार पाऊस पडत असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यात राज्य आपत्ती व्यवस्थापनाने रेड अलर्ट जारी केला आहे. केरळमधील इदुक्की, मलप्पुरम, वायनाड आणि कन्नूर, एर्नाकुलम आणि थ्रिसूर या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.