लाल सड रोगामुळे लाखोंचे ऊस पिक नष्ट

मुरादाबाद : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता ऊसावरील लाल सड रोगाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या रोगामुळे यंदा लाखो रुपयांचे पिक नष्ट झाले आहे.

ऊसाच्या ०३८ या प्रजातीवर लाल सड रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पिक अक्षरशः खराब झाले आहे. जिल्ह्यातील अन्सारीआन येथील शेतकरी अहसान उस्मानी यांच्या ६० एकर क्षेत्रातील ऊस लाल सड रोगामुळे वाळून नष्ट झाला आहे.

या रोगाच्या फैलावामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत या रोगावर प्रभावी उपाययोजना, किटकनाशके नसल्याचे सांगीतले जात आहे. अहसान यांच्यासह फहीम अहमद, नसीम अहमद, जाकिर हुसेन आदींसह डझनभर शेतकऱ्यांच्या लाखो एकरातील ऊस पिक या रोगाने नष्ट केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here