अर्थव्यवस्थेत सुधारणांमुळे ओपेक तेल उत्पादन वाढवणार

फ्रँकफर्ट : इंधन निर्यातदार देशांची संघटना (ओपेक) आणि सहयोगी उत्पादक देशांकडून तेलाचे उत्पादन वाढवून २१ लाख बॅरल प्रती दिन करण्यात येणार आहे. काही देशांच्या अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे पाहून ओपेकने हा निर्णय घेतला आहे. ओपेक आणि सहयोगी तेल उत्पादक देशांच्या (ओपेक प्लस) उर्जा मंत्र्यांनी मंगळवारी ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेतला.

सद्यस्थितीत ओपेक आणि संलग्न उत्पादक देशाचे सदस्य जागतिक तेल बाजारातील परस्पर विरोधी दबावाखाली आहेत. एकीकडे भारतासारख्या काही देशांत कोविड १९च्या संक्रमण फैलावामुळे मागणी कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काही देशांची आर्थिक स्थिती सुधारल्याने मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. संघटनेने याचे सर्व पैलू तपासून उत्पादन वाढीचा निर्णय घेतला.

सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील ओपेक तथा अन्य सहयोगी देशांना भारतासारख्या देशांतील कोरोना वाढीमुळे जागतिक मागणी आणि किमतीवर परिणाम होण्याची भीती सतावत आहे. तेल क्षेत्रात भारत प्रमुख ग्राहक आहे. तेल उत्पादक देशांनी २०२० मध्ये महामारीमुळे आलेल्या मंदीची स्थिती पाहून किंमती टिकवून ठेवण्यासाठी उत्पादनात उल्लेखनीय कपात केली होती. आता त्यांना तेल उत्पादन वाढविणे किती गरजेचे आहे, हे पाहून निर्णय घेतला आहे.

अमेरिका, युरोप आणि आशियातील आर्थिक सुधारणांमुळे दुसऱ्या सहामाहीत उर्जेची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी जागतिक मानक ब्रेंट क्रुडचा दर २.२ टक्क्यांनी वाढून ७०.८५ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचला. ओपेकने जून महिन्यात ३,५०,००० बॅरल प्रती दिन आणि जुलैमध्ये ४,४०,०० बॅरल प्रती दिन उत्पादन वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सौदी अरेबीया १० बॅरलची स्वेच्छिक कपात करून हळूहळू उत्पादन वाढवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here