देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेचा चौदावा हप्ता नुकताच देण्यात आला. आता पंधराव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्हाला या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन नोंदणी करू शकता. त्यासाठीची प्रक्रिया सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबवते. अशाच एका योजनेचे नाव आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. योजनेचा १४ हप्त्यांमध्ये करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता जारी केला जातो. नव्या हप्त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या हप्त्याचे पैसे नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. २७ नोव्हेंबरपर्यंत हे पैसे येणे अपेक्षित आहे. योजनेंतर्गत केवळ अशाच शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळणार आहेत. ज्यांनी पीएम किसान सन्मान निधी दिला आहे