रिलायन्स इंडस्ट्रीजकडून सौदी अरामकोसोबत नव्या डीलची तयारी सुरू

28
नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सौदी अरेबिया येथील कंपनीन सौदी अरामकोला आपला २० टक्के तेल रिफायनरी आणि पेट्रो रसायन व्यवसाय विक्री करण्याच्या १५ अब्ज डॉलरच्या सौद्याचे पुनर्मुल्यांकन करण्याची घोषणा केली आहे. या सौद्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने स्वतः दिलेली मुदत दोन वेळा संपुष्टात आली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की, दोन्ही कंपन्यांच्या भारतीय फर्मनी नव्या ऊर्जा व्यवसायातील प्रवेशापूर्वी गुंतवणूकीचे पुर्नमुल्यांकन करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. रिलायन्सच्या हिस्सा विक्रीचे वृत्त सर्वात प्रथम ऑगस्ट २०१९ मध्ये पहिल्यांदा अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीजने वैकल्पिक ऊर्जा व्यवसायात १० अब्ज डॉलर गुंतवणूक करुन नव ऊर्जा व्यवसायात पाऊल टाकले आहे. त्यामुळे आता यांचे फेरमूल्यांकन केले जात आहे.
याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या अधिकृत घोषणेत म्हटलं आहे की, कंपनीच्या व्यापारी पोर्टफोलिओचा विस्तार झाला आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी ओ२सी व्यवसायात प्रस्तावित गुंतवणूक करण्याबाबत फेरमूल्यांकन करुन घेणे फायदेशीर ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here