रिलायंस रिटेल ला तिसरी मोठी गुंतवणूक, जनरल अटलांटिक यांच्याशी 3675 करोडची डील

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे व्यापारी मुकेश अंबानी यांच्या रिलायंस रिटेल ला आणखी एक मोठी गुंतवणूक मिळाली आहे. रिलायंस ची कंपनी रिटेल वेंचर्स लिमिटेड मध्ये प्रायवेट इक्विटी फर्म जनरल अटलांटिक 3,675 करोड रुपयांची गुंतवणूक करेल. यामुळे कंपनीची रिलायंस रिटेल मध्ये 0.84 टक्के भागीदारी होईल. यापूर्वी कंपनीने रिलायंस च्या जिओ प्लॅटफॉर्म वरही गुंतवणूक केली होती. याशिवाय रिलायंस रिटेल व्यापारामध्ये यूएई च्या फर्म मुबादला ही जवळपास 7400 करोड रुपयांची गुतवणूक करु शकते. अलीकडेच रिलायंस रिटेलमध्ये अमेरिकेची खाजगी इक्विटी कंपनी सिल्वरलेक पार्टनर्स आणि केकेआर यांनी गुंतवणूक केली आहे.

अलीकडेच रिलायंस रिटेल ला अमेरिकेच्या खाजगी इक्विटी कंपनी सिल्वरलेक पार्टर्नर्स कडून 7500 करोड रुपये मिळाले आहेत. याच्या बदल्यात रिलायंस रिटेल ने आपली 1.75 टक्के भागीदारी विकली आहे, तिथे इक्विटी फर्म केकेआर नेही रिलायंस रिटेलमध्ये 5,550 करोड रुपयांच्या गुंतवणूकीची घेषणा केली आहे. या गुंतवणुकीनंतर रिलायंस रिटेल मध्ये केकेआर ची 1.28 टक्के भागीदारी होईल.

वेगवेगळ्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, रिलायंस रिटेलमध्ये गुंतवणुकीसाठी सोशल साइट फेसबुक आणि ई कॉमर्स कंपनी अमेझॉन ही तयार आहे. फेसबुक ने जिओ प्लॅटफॉर्म वर जवळपास 45 हजार करोड रुपयांच्या गुंतवणुक करून जवळपास 10 टक्के भागीदारी घेतली आहे. अमेझॉन पहिल्यांदाच रिलायंस इंडस्ट्रिज मध्ये गुंतवणूक करेल.

दरम्यान, आयआयएफएल वेल्थ हारुन इंडिया रिच लिस्ट 2020 च्या नुसार, मुकेश अंबानी यांनी लॉकडाउन नंतर आतापर्यंत प्रत्येक तासाला 90 करोड रुपये कमावले आहेत. त्यांचे नेटवर्थ वाढून 6,58,400 करोड रुपयांपर्यंत पोचले आहे. अहवालानुसार, गेल्या 12 महिन्यामध्ये मुकेश अंबानी यांची वेल्थ 73 टक्के वाढून 2.77 लाख करोड रुपयांपासून 6.58 लाख करोड रुपयांपर्यंत पोचली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here