सहा दिवसांनंतर दिलासा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही

नवी दिल्ली : सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज, बुधवारी सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल केले नाहीत. काल डिझेलचा दर स्थिर होता, तर पेट्रोलचे दर ३१ ते ३५ पैशांनी वाढले होते. अनेक राज्यांमध्ये हे दर १०० रुपयांवर पोहोचले आहेत. देशात दररोज पेट्रोल-डिझेलच्या दराचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्नावर पडत आहे.
दिल्लीत पेट्रोलचा दर ११०.०४ रुपये तर डिझेलचा दर ९८.४२ रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ११५.८५ रुपये आणि डिझेलचा दर १०६.६२ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ११०.४९ रुपये तर डिझेल १०१.५६ रुपये प्रती लिटर झाला आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०६.६६ रुपये तर डिझेल १०२.५९ रुपये प्रती लिटर झाले आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांवर आहेत. तर मुंबई सर्वाधिक दराने पेट्रोल मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीच्या आधारावर आणि परकीय चलनावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल केले जातात. पेट्रोलियम कंपन्या दरांचा आढावा घेऊन पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांकडून दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. त्याची माहिती तुम्हाला आयओसीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here