एका वर्षानंतर केनियामधील चेमेलिल साखर कारखाना होणार पुन्हा सुरु, ऊस शेतकरी खूश

118

नैरोबी (केनिया): केनियातील शेतकर्‍यांना सततच्या संघर्षामुळे येथील चेमेलिल साखर कारखाना पुन्हा एकदा सुरु होणार आहे. जवळपास एक वर्षापासून बंद करण्यात आलेला कारखाना या गुरुवापासून सुरु होईल. यामुळे ऊस शेतकर्‍यांबरोबरच परिसरातील सर्वांच्यातच आनंदाचे वातावरण आहे.

केनिया शुगरकेन ग्रोअर असोसिएशनचे महासचिव रिचर्ड ओगेंडो यांनी सांगितले की, कारखाना बंद झाल्यानंतर शेतकरी सतत संघर्ष करत होते आणि शेवटी पुन्हा एकदा शेतकरी जिंकले. कारखान्याच्या खराब अर्थिक स्थितीमुळे गेल्या वर्षी कारखाना बंद करण्यात आला होता. एका अहवालामध्ये कारखान्याला पुन्हा एकदा चालू करण्याची माहिती दिली गेली आहे, जो अहवाल कृषी विभागाचे कार्यकारी अध्यक्ष जे.ओ. ओसेवे यांनी 21 फेब्रुवारीला दिला आहे. हा कारखाना बंद झाल्यामुळे नंदी आणि किसुम परिसरातील 20,000 पेक्षा अधिक करारबद्ध शेतकर्‍यांशिवाय आसपासच्या शहरातील कामकाजावरही परिणाम झाला होता.

शेतकर्‍यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, या निर्णयाची अनेक दिवसापासून वाट पहात होतो. आता सर्व व्यवसाय पुन्हा एकदा सुरळीत सुरु होतील. ओगेंडो यांनी सांगितले की, शेतकरी एक वर्षापासून कारखाना पुन्हा सुरु करण्यासाठी संघर्ष करत होते. कारखान्याचे संचालक गेब्रियल न्यागवेसो यांनी गेल्या काही दिवसात कारखाना कामगार आणि शेतकर्‍यांना आश्‍वासन दिले होते की, व्यवस्थापन लवकरच कारखाना सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here