ऊस पुरवठा मर्यादेत वाढ, शेतकऱ्यांना होणार फायदा

मुरादाबाद : ऊस उत्पादक शेतकरी आता जादा उसाचा पुरवठा करू शकणार आहेत. एक हेक्टरपर्यंत शेती असलेले शेतकरी असोत अथवा छोटे शेतकरी, त्यांच्यासाठी ऊस पुरवठ्याची मर्यादा वाढविण्यात आली आहे. राज्याच्या ऊस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानंतर शेतकऱ्यांना ऊस पुरवठ्यात सवलत मिळणार आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस आयुक्तांनी जिल्ह्यातील ऊस मंजुरी मर्यादेत वाढ केली आहे. गळीत हंगाम २०२३-२४ साठी ऊस पुरवठा धोरणाचा शेतकऱ्यांना फायदा मिळेल. एक हेक्टरवाल्या शेतकऱ्यांना यापूर्वी ८५० क्लिंटल ऊस पाठवता येत होता. तो आता ९०० क्विंटल करण्यात आला आहे. तर लघू श्रेणीत येणारे दोन हेक्टर जमीनधारक शेतकरी आता १७०० क्विंटल ऐवजी १८०० क्विंटल ऊस पुरवठ्याची परवानगी मिळणार आहे. अशाच प्रकारे नियमित शेतकऱ्यांना ४२५० क्विंटलऐवजी ४५०० क्विंटल ऊस पुरवठा करता येणार आहे. छोटे शेतकरी साठ ऐवजी ७२ क्विंटल ऊस पाठवू शकतील. याशिवाय ठिबक सिंचन पद्धती वापरणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त ऊस नोंदीत प्राधान्य मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here