नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अद्ययावत अनुमानानुसार उत्तर भारतात २४ ते २८ एप्रिल या कालावधीत वादळी वारे वाहतील. आयएमडीने सांगितले की, पुढील ५ दिवस गुजरातमध्ये गरम हवा राहील. त्यासोबतच मध्य आणि पूर्व भारतात २५ एप्रिलपासून तसेच उत्तर -पश्चिम भारतात २६ एप्रिलपासून उष्णतेची लाट असेल. उत्तर आणि पूर्व भारतात आगामी काही दिवसात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आसाम, अरुणाचल प्रदेशात २४-२६ एप्रिल या काळात पाऊस पडेल. तर मेघालयमध्ये २४, २७ आणि २८ एप्रिल रोजी पाऊस पडणार आहे.
मनीकंट्रोल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार पश्चिम बंगाल आणि सिक्कीमध्येही पुढील पाच दिवसांत चांगला पाऊस कोसळेल. हवामान विभागाने सांगितले की, आसाम, मेघालयमध्ये ३-४० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहतील. यासोबतच पुढील दोन दिवसांत पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये पाऊस कोसळेल. छत्तीसगढमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.