घाऊक महागाईच्या दरापासून दिलासा, जुलैमध्ये १४ टक्क्यांपेक्षा कमी

नवी दिल्ली : जुलै महिन्यात घाऊक महागाईच्या दरापासून दिलासा मिळाला आहे. महागाईचा दर घसरुन १४ टक्क्यांच्या स्तरापेक्षा कमी झाला आहे. एक महिन्यापूर्वी घाऊक महागाईचा दर १५ टक्क्यांवर होता. अन्नधान्याच्या दरात घसरणीमुळे घाऊक महागाईचा दर कमी झाला आहे. सलग दुसऱ्या महिन्यात हा दर घसरला आहे. मात्र, गेले १६ महिने महागाईचा दर १० टक्क्यांवर आहे. जुलै महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीत घसरण झाली. मात्र, इंधनाच्या महागाईमुळे वाढ कायम आहे.
टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, आज उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात घाऊक किमतीवर आधारीत महागाईचा दर १३.९३ टक्क्यांवर आला आहे. खाद्य किमती आणि मॅन्युफॅक्चर्ड वस्तूंच्या घाऊक किमतीत घट झाल्यामुळे हा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात घाऊक महागाईचा दर १५.१८ टक्के इतका होता. त्याआधी मे महिन्यात या दराने १५.८८ टक्क्यांचा उच्चांक गाठला होता. तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात महागाईचा दर ११.५७ टक्केवर होता. जुलै महिन्यात इंधन आणि पॉवर बास्केटच्या महागाईत उसळी दिसून आली होती. जुलैच्या सेगमेंटमध्ये महागाईचा दर ४३.७५ टक्क्यांवर राहिला. तर जून महिन्यात हा आकडा ४०.३८ टक्के होता. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे जवळपास २ महिने स्थिरता आहे. मात्र, क्रूड आणि कोळशाच्या किमतीत उसळी दिसून आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here