सोमवारीही दिलासा : पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल नाही

आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या आठवड्याभरात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी असूनही सलग ५३ व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आलेला नाही. आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार मुंबईत पेट्रोल सर्वाधिक महाग १०९.९८ रुपये प्रती लिटर तर दिल्लीत सर्वात स्वस्त ९०.४१ रुपये प्रती लिटर आहे. तर पाटणा येथे पेट्रोल १०४.६७ आणि चेन्नईत १०१.४० रुपये आणि बेंगळुरू येथे १००.५८ रुपये प्रती लिटर आहे.

राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल ११२.११ रुपये तर डिझेल ९५.२६ रुपये प्रती लिटर आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०७.२३ रुपये आणि डिझेल ९०.८७ रुपये प्रती लिटर आहे. जयपूरमध्ये पेट्रोल १०७.०६ रुपये तर डिझेल ९०.७० रुपये प्रती लिटर आहे. रांची येथे पेट्रोल ९८.५२ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९१.५६ रुपये प्रती लिटर आहे. तर चंदीगडमध्ये पेट्रोल ९४.२३ रुपये आणि डिझेल ८०.९० रुपये प्रती लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. त्याची माहिती तुम्हाला आयओसीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here