कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा, जुलैमध्ये चांगल्या पावसाची शक्यता

नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. गुरुवारी हवामान विभागाने सांगितले की, दक्षिण पश्चिम मान्सून जुलै महिन्यात सर्वसामान्य राहण्याची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता नाही. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस चांगला जोर पकडेल अशी शक्यता आहे.

देशात यंदा खरीप हंगामात २० कोटींहून अधिक शेतकरी भात, सोयाबीन, कापूस, मक्का, मुग, शेंगदाणे, ऊस, उडीद आणि तूर पिकवतील. यासाठी शेतकरी पावसावर अवलंबून असतात. मान्सून नियमित राहणार असल्याने शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन दिलासा मिळणार आहे.

आयएमडीने सांगितले की जुलै महिन्यात ९४ ते १०६ एलपीए पाऊस होईल. हवामान विभाग जुलै अखेरीस आपला उर्वरित कालावधीचा हवामान अंदाज व्यक्त करणार आहे. सध्या हरियाणा, दिल्ली आणि पंजाबचा काही भाग पावसाविना आहे. ८ जुलै नंतर मान्सून गती घेईल. उत्तर पश्चिम भारतात मान्सून दाखल झालेला नाही असं हवामान खात्याने सांगितले.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here