भारताला कोरोनापासून दिलासा, २४ तासांत नवे ८६३५ रुग्ण

96

नवी दिल्ली : प्रदीर्घ कालावधीपासून कोरोनाच्या संकटाशी सामना करत असलेल्या भारताला व्हॅक्सिन मिळाल्यानंतर दिलासा मिळत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशभरात ८६३५ नवे कोविड १९चे रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय, एका दिवसात १३ हजार ४२३ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर ९४ जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे एकूण कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या १ कोटी ७ लाख ६६ हजार २४५ इतकी झाली आहे. त्यापैकी १ कोटी ४ लाख ४८ हजार ४०६ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ५४ हजार ४८६ इतकी झाली आहे. तर अद्याप १ लाख ६३ हजार ३५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ३९ लाख ५० हजार १५६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारीपर्यंत लसीकरण मोहिमेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. ३१ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील उपचार सुरू असलेल्यांची संख्या ५००० हून कमी आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील उपचार सुरू असलेल्यांची संख्या ४ आहे. तर दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली येथे सहा जणांवर उपचार सुरू आहेत.

कोविड १९चे ७९.६९ टक्के उपचार सुरू असलेले रुग्ण पाच राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांमध्ये आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार, केरळ आणि महाराष्ट्रात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या देशातील एकूण उपचारातील रुग्णसंख्या ६९.४१ टक्के इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here