दक्षिण भारतातील शेतकऱ्यांना दिलासा, पाऊस थांबणार

62

दक्षिण भारतात सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या पावसामुळे सर्वजण हवालदिल आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा पाऊस आता शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत पाऊस थांबू शकतो. मात्र, तामीळनाडूतील काही जिल्ह्यांत अद्याप आव्हानात्मक स्थिती आहे.

आयएमडीने तामीळनाडूतील या तीन जिल्ह्यांसाठी रेल अलर्ट जारी केला आहे. यामध्ये तुतुकुडी, तेनकाशी आणि तिरुनेलवेली यांचा समावेश आहे. याशिवाय आणखी काही जिल्ह्यात पावसाचे तांडव होऊ शकते. यामध्ये कल्लाकुरिची, नागापट्टिनम, पुदुक्कोटै, शिवगंगा, विरुधुनगर आणि कन्याकुमारीचा समावेश आहे. आयएमडीने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मात्र, हे जिल्हे वगळता देशभरात कोणत्याही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता नाही.

दक्षिण भारतात या पावसाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. एकीकडे शेतकरी उत्पन्नामुळे अस्वस्थ होते. आता पावसाने त्यांच्या समस्या आणखी वाढवल्या आहेत. अनेकांची तयार पिके खराब झाली आहेत. तर काही जणांची तयार होणारी पिके नष्ट झाली आहेत. शेतकरींचे बियाणे, खते, पिके सर्व काही उद्ध्वस्त झाली आहेत. दक्षिण भारतातील पावसाचा टोमॅटोच्या दरवाढीत मोठा समावेश आहे. भारताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकवले जातात. मात्र आताच्या पावसाने टोमॅटोचे पिक पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. सद्यस्थितीत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पुढील काही दिवसांत थांबणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here