दिवाळीत जनतेला दिलासा; सरकारकडून पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज टॅक्समध्ये कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिवाळीच्या सणानिमित्त ग्राहकांना मोठा दिलासा देत,बुधवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपातीची घोषणा केली आहे.

पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता हे नवे दर लागू झाले आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी स्तरावर असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवारी दिल्लीत पेट्रोल ११०.०४ रुपये प्रती लिटर तर डिझेल ९८.४२ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. तर मुंबईत आता पेट्रोल ११५.८५ रुपये तर डिझेल १०६.६२ रुपये प्रती लिटर दराने विक्री केली जात होती. आता यामध्ये अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची कपात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here