आज मिळाला दिलासा, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ नाही

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज, सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. काल डिझेलच्या दरात २९ ते ३६ पैसे आणि पेट्रोलच्या दरात २५ ते ३३ पैसे वाढ केली होती.

दिल्लीत आज पेट्रोलचा दर १०२.३९ रुपये तर डिझेलचा दर ९०.७७ रुपये प्रती लिटर आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर १०८.४३ रुपये आणि डिझेलचा दर ९८.४८ रुपये प्रती लिटर आहेत. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०३.०७ रुपये तर डिझेलचा दर ९३.८७ रुपये प्रती लिटरवर पोहोचला आहे. तर चेन्नईतही पेट्रोल १००.०१ रुपये आणि डिझेल ९५.३१ रुपये लिटरवर आले आहे.

सद्यस्थितीत देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिसा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.
आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीच्या आधारावर आणि परकीय चलनावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल केले जातात. पेट्रोलियम कंपन्या दरांचा आढावा घेऊन पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांकडून दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here