इथेनॉल उत्पादन क्षमता वाढीसाठी रेणुका शुगर्सची ४५० कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली : श्री रेणुका शुगर्सने आपली इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी ४५० कोटी रुपये गुंतवणुकीची घोषणा केली आहे. याबाबत शेअर बाजाराला पाठविण्यात आलेल्या निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, संचालक मंडळाने इथेनॉल उत्पादन क्षमता प्रती दिन ४३० किलो लिटरने वाढवून १४०० किलो लिटर करण्यास मंजुरी दिली आहे.

यापूर्वी कंपनीच्या संचालक मंडळाने फेब्रुवारी महिन्यात इथेनॉल उत्पादन क्षमता ७२० किलो लीटर प्रती दिवसपासून वाढवून ९७० किलो लिटर प्रतीदिन करण्यास मंजुरी दिली होती. कंपनीने सांगितले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाबाबत सरकारी धोरण पाहता इथेनॉल उत्पादन क्षमता ९७० किलो लिटर प्रती दिनवरुन वाढवून १४०० किलो लिटर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या क्षमता विस्तारासाठी ४५० कोटी रुपये गुंतवणूक करण्याची गरज आहे असे कंपनीने सांगितले. हा क्षमता विस्तार ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here