श्री रेणुका शुगर्सच्या इथेनॉल उत्पादन क्षमतेचा १२५० केएलपीडीपर्यंत होणार विस्तार

70

श्री रेणुका शुगर्सने डिसेंबर २०२२ पर्यंत आपल्या इथेनॉल उत्पादन क्षमता ७२० केएलपीडीवरून १२५० केएलपीडी करण्यात येत असल्याची माहिती भारतीय शेअर बाजाराच्या नियामकांकडे सादर केलेल्या फायलिंगमध्ये दिली आहे. या माहितीनंतर सोमवारी कंपनीचा शेअर्समध्ये १.६२ टक्के वाढ होवून तो ५०.२५ रुपयांवर पोहोचला. रेणुका शुगर्सच्या संचालक मंडळाने फेब्रुवारी २०२१ मध्ये इथेनॉल उत्पादन क्षमता ७२० वरून ९७० किलो लिटर प्रती दिन करण्यास मान्यता दिली होती. या कॅपेक्स योजनेसाठी २०४ कोटी रुपयांची गुंतवणूक कर्ज उभारणीद्वारे करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणामुळे वाढती मागणी लक्षात घेवून कंपनीच्या संचालक मंडळाने २५ जून २०२१ रोजीच्या बैठकीत इथनॉल उत्पादन क्षमता ९७० केएलपीडीवरून १४०० केएलपीडीपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली होती. सध्याच्या क्षमता विस्तारासाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. कंपनीने एक्स्चेंजकडे केलेल्या फायलिंगनुसार एकूण क्षमतेचा ८० टक्के विस्तार करण्यात आला आहे. केंद्र सरकारने २०२५ पर्यंत इथेनॉल मिश्रण २० टक्के करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे इथेनॉलची प्रचंड मागणी भविष्यात फायदेशीर ठरेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

रेणुका शुगर्स भारतातील सर्वात मोठी साखर व हरित ऊर्जा उत्पादकांपैकी एक आहे. कंपनी ब्रँडेड शुगर सेगमेंटमध्ये अग्रेसर आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीची विक्री १३४.९० टक्क्यांनी वाढून १९५३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here