साखर कारखान्यांमध्ये दुरुस्तीचे काम जोरात

89

कोल्हापूर: 2020-2021 गाळप हंगामासाठी काम जोरात सुरु आहे. गाळप हंगामाच्या तयारीमुळे साखर कारखान्यांकडून दुरुस्ती आणि देखभालीचे काम जोरात सुरु आहे. गाळपासाठी साखर कारखान्यांची तांत्रिक दुरुस्ती आवश्यक आहे. पण लॉकडाउनमुळे स्पेअर पार्टस मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत. कारखान्यांच्या गाळप हंगामाच्या सांगतेनंतर मे मध्ये तांत्रिक दुरुस्तीचे काम वेळेत होते. यामध्ये बॉयलर, देखभाल, मशीनरी कामांचा समावेश होतो. कारखान्यांचे गाळप ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान सुरु होणार आहे, कारखान्याच्या व्यवस्थापनासमोर काम वेळेप पूर्ण करण्याचे आव्हान आहे. गाळप हंगामसाठी ऊस वाहतूक वाहनांच्या कराराला अंतिम रुप देण्यात आले आहे. सर्व ट्रान्सपोर्टस चे पैसेंही देण्यात आले आहेत .

बॉयलर निरीक्षण, वजन काट्याची दुरुस्ती, फ्लो मीटर कैलिब्रेशन, विद्युत उपकरणाची तापसणी आदी काम प्रत्येक वर्षी करणे अनिवार्य असते. याशिवाय इलेक्ट्रिकल मोटर्स, पैनल बोर्ड, पावर टरबाइन आदी मशिनरीची दुरुस्ती केली जात आहे. लॉकडाउनमुळे दुरुस्तीसाठी सामग्री उपलब्ध होईल की नाही याची कोणतीही गॅरंटी नाही. पण कारखाना व्यवस्थापन गाळपात कोणतीही बाधा येवू नये यासाठी कोणतीही कसूर करु इच्छित नाही. यामुळे साखर कारखान्यांनी दुरुस्तीचे काम गतीने सुरु केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here