डोंबिवलीत प्रदूषणामुळे गुलाबी रस्ता मुख्यमंत्र्यांनी मागविला अहवाल

मुंबई दि 5: डोंबिवलीत प्रदूषणामुळे रस्ता गुलाबी झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

या संदर्भात तातडीने माहिती घेत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर डोंबिवलीतील या प्रकरणी मुख्यमंत्री यांनी माहिती घेतली व संबंधितांना अहवाल देण्याचे व पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here