रीगा साखर कारखान्यासाठी केंद्र, राज्याकडे मदतीची मागणी

शिवहर : शिवहर, सीतामढी, चंपारण आणि मुझफ्फरपूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण असलेला रीगा साखर कारखाना आता पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या हंगामात कारखान्यात गाळप सुरू होऊ शकलेले नाही. आगामी काळातही कारखाना सुरू होऊ शकेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

शेतकरी आणि कारखान्यातील कामगार आपल्या मागण्यांवर अडून राहिले आहेत. कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, आता त्यांच्याकडे कोणतेच प्रयत्न शिल्लक नाहीत. चारही बाजूने टीका होत असलेले रीगा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी संचालक ओम प्रकाश धानुका यांनी केंद्र आणि राज्य सरकार, केंद्रीय मंत्री, केंद्रीय सचिव, खासदार व आमदारांकडे साखर कारखाना वाचविण्यासाठी मदत मागितली आहे.

धानुका यांनी साखर कारखाना वाचविण्यासाठी यापूर्वीही केंद्र आणि राज्य सरकारकडे मदत मागितली होती. वेळोवेळी निवेदनेही दिली आहेत. मात्र, कोंडी फुटत नसल्याने ते हताश झाले आहेत. त्यांनी सरकार, कामगार आणि शेतकऱ्यांकडे सहकार्याचे आवाहन केले आहे. आता आपण ६० लाख रुपयांची भरपाई करण्यास तयार आहोत. सरकारने मदत केली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, राज्य सरकारने धानुका यांच्यावर आरोप करीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. साखर कारखाना सुरू रहावा अशी अपेक्षा असल्याचे धानुका सांगतात. त्याकडून पैशाची अपेक्षा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राज्य आणि केंद्र सरकार, कर्मचाऱ्यांनी कारखाना वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता आमच्याकडे देण्यासारखे काही नाही असे धानुका यांनी सांगत याबाबतचा एक व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here