“ऊस संशोधनावर भर देण्याची गरज”

कोइंबतूर : ऊस संशोधकांनी साखर आणि ऊर्जेचे गरज भागविण्यासाठी को ०२३८ यांसारख्या प्रजाती विकसित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्लीचे (आईसीएआर) पिक विज्ञान विभागाचे उप महासंचालक टी. आर. शर्मा यांनी केले.

“ऊस परिदृश्य: संशोधन आणि औद्योगिक परिप्रेक्ष्य” या विषयावरील एका सत्रात बोलताना त्यांनी सांगितले की, संशोधकांनी हवामान बदलास स्वीकारणाऱ्या प्रजाती विकसित करण्यावर लक्ष दिले पाहिजे. ते म्हणाले, तोडणीसाठी उपयुक्त मशीनरी विकसित करण्याची गरज आहे. तेलबिया आणि कडधान्यांसह ऊसाची आंतरपीक घेण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञान सुधारले पाहिजे.

ICAR-Sugarcane Breeding Institute चे माजी संचालक बख्शी राम यांनी संशोधकांना Co ०११८ प्रजातीशी मिळती जुळती, लाल सड अथवा टॉप बोरर रोगच्या तडाख्यात सापडणाऱ्या Co ०२३८ आणि जादा पाणी लागणाऱ्या को ८६०३२ यासारख्या प्रजातींची नकारात्मक लक्षणे दूर करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन केले. कारण, दक्षिण भारतात उसाच्या या तीन प्रजाती सर्वात लोकप्रिय आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here