ऊसाच्या १५०२३ प्रजातीच्या संशोधकांचा कारखाना प्रशासनाच्यावतीने सन्मान

नजीबाबाद : बरकातपूर येथील उत्तम शुगर मिलच्यावतीने ऊसाच्या १५०२३ या प्रजातीचे जनक आणि कीटक रोग विशेषज्ञांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संशोधकांनी उसाच्या अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना विविध टिप्सही दिल्या. उत्तम शुगर मिलकमध्ये कर्नालहून आलेले, उसाचे १५०२३ या प्रजातीचे जनक डॉ. रविंद्र कुमार आणि ऊस कीटक विशेषज्ञ डॉ. एस. के. पांडे यांचा कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक अरविंद कुमार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. रविंद्र कुमार यांनी १५०२३ ही उसाची नवी प्रजाती असल्याचे सांगितले. या प्रजातीवर रोगाची शक्यता खूप कमी आहे. त्याचे उत्पादन इतर बियाण्यांच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतांमध्ये १५०२३ या प्रजातीच्या उसाची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले. कीटक रोड विशेषज्ञ डॉ. एस. के. पांडे यांनी अधिक उत्पादनाबाबत टीप्स दिल्या. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसावर शूट बोरर, टॉप बोरर आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपले पिक वाचविण्यासाठी एक मिली इमिडाक्लोरोपीड प्रती लिटर पाण्यातून एका एकरात प्रती ३०० मिली लिटर औषध फवारणी करावी असे आवाहन त्यांनी केली. किटकनाशकांचा वापर करुन या रोगांना आळा घालता येईल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here