ऊसतोड कामगार महिलांचा सन्मान

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त दौंड तालुक्यातील पश्चिम दौंड डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून कष्टकरी ऊसतोड महिलांचा साडीचोळी तसेच ओटी भरून महिला दिन साजरा करण्यात आला.

पश्चिम दौंड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप खेडेकर यांनी सांगितले की, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ऊसतोड कामगार महिलांचा सन्मान करण्यात आला.. महालक्ष्मी ऑटोमोटीव्ह मारुती सुझुकी बारामती आणि पश्चिम दौंड डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम पार पडला. प्रास्ताविक डॉ. अनुजा अवचट यांनी तर आभार डॉ. भारती खेडेकर यांनी मानले. यावेळी असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉ. स्वाती व्होरकाटे, डॉ. प्रभावती रुपनवर, डॉ. निवेदिता वाघचौरे, डॉ. सुकन्या रणसिंग, नम्रता राजगुरु, वैशाली चव्हाण उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here