आयान साखर कारखान्याचा स्मार्ट शुगरला प्रतिसाद

नंदुरबार: समशेरपूर येथील अयान साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.सी़. बडगुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखाना ऊस दरात वाढ करत शेतकऱ्यांना २ हजार ३७५ रुपये मेट्रीक टनाप्रमाणे दर देणार आहे़. कारखान्याने यंदाच्या वर्षात स्मार्ट शुगर योजनेंतर्गत स्वयंचलित वजन काटा ,व इतर तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़.

बडगुजर म्हणाले की, यंदा अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान झाले होते़. या पार्श्वभूमीवर कारखान्याने यापूर्वी ऊसाला २ हजार ३४५ रुपये प्रती मेट्रीक टन दर दिला होता . यातून शेतकऱ्यांची भरपाई होणार नसल्याने कारखान्याने ऊसाच्या दरात वाढ करुन दर २ हजार ३७५ रुपये मेट्रीक टन केला आहे़. कारखान्यास ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे जास्तीत जास्त १० दिवसात देणार असल्याचे कळवण्यात आले आहे़.

या निर्णयाचे शेतकरयांनी स्वागत केले असून नोव्हेंबर महिन्यात ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती अयान साखर कारखाना प्रशासनाने दिली आहे़. यंदा समशेरपूर साखर कारखान्यास ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर स्मार्ट शुगर योजनेंतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित वजन काटा सुरु करण्यात आल्याचे बडगुजर यांनी सांगितले़.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here